पंचायत समितीच्या माध्यमातून तालुका कोरोनामुक्त करणार

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 20 जून 2021 :- शेवगाव तालुका कोरोनामुक्त करण्यासाठी पंचायत समितीच्या माध्यमातून प्रयत्न केले जात असून, लवकरच गाव तेथे लसीकरण मोहीम सुरू करण्यात येणार आहे, कोरोनाची ही लाट ओसरत असली तरी सर्वांनी सतर्क राहून आगामी तिसरी लाट रोखण्यासाठी सहकार्य करून तालुका कोरोनामुक्त करावा, असे आवाहन पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितीजभैया घुले यांनी केले.

माजी आमदार डॉ. नरेंद्र घुले पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कृषी उत्पन्न बाजार समिती येथे राष्ट्रवादीच्या वतीने रक्तदान शिबीर व कोविड योद्ध्यांचा सन्मान कार्यक्रमात सभापती डॉ. घुले बोलत होते. अध्यक्षस्थानी काकासाहेब नरवडे होते.

या वेळी बाजार समिती व विविध संस्थांच्या वतीने मा. आ. नरेंद्र घुले यांचा बाजार समितीचे सभापती अनिल मडके व मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच कोरोना काळात योगदान देणारे डॉ. कैलास कानडे, शैलजा राऊळ, सुरेश पाटेकर,

डॉ. विजय लांडे, पुष्कर शहाणे, विद्या सावंत, पूजा खेडकर, सूरज सुसे, भारत चव्हाण, सुरेश चव्हाण, संजय रानडे, धनंजय खरात, प्रियांका मगर आदींना कोरोनायोध्दा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सभापती डॉ. घुले म्हणाले,

सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करताना घुले कुटुंबीयांनी स्व. लोकनेते मारुतराव घुले पाटील यांच्या विचारांचा वसा घेऊन ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत विकासाची गंगा पोहचवण्याचा प्रयत्न केला असून, यापुढेही तो प्रामाणिकपणे सुरूच राहील.

कोरोनाच्या काळात कोविड सेंटर सुरू करून रुग्णांना दिलासा देण्याचे काम केले. या वेळी राष्ट्रवादी युवकचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय कोळगे, बाजार समितीचे सभापती अनिल मडके, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. कैलास कानडे, पंडित भोसले, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष कल्याण नेमाणे यांची भाषणे झाली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe