सिना नदीपात्रातुन अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर तहसीलदारांची धडक कारवाई

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 28 मे 2021 :- कोरोना आणि लॉकडाऊनचा फायदा घेत जिल्ह्यात वाळू तस्करी जोरात सुरु झाली आहे. लॉकडाऊनमुळे बाहेर गर्दी नसल्याचा वाळूतस्कर फायदा घेत आहे.

मात्र याला आळा बसावा यासाठी प्रशासनाकडून सातत्याने कारवाई केली जात आहे. नुकतेच कर्जत तालुक्यात वाळू तस्करांच्या विरोधात एक कारवाई पार पडली आहे.

कर्जत तालुक्यातील नागलवाडी येथील सिना नदी पात्रातून अवैध वाळू उपसा करणाऱ्या सहा वाहनांवर प्रांताधिकारी अर्चना नष्टे आणि तहसीलदार नानासाहेब आगळे यांच्या पथकाने कारवाई केली.

याबाबत अधिक माहिती अशी की, प्रांताधिकारी अर्चना नष्टे यांना नागलवाडी येथील सिना नदीपात्रातून अवैध वाळू उपसा होत असल्याची माहिती मिळाली.

त्यानुसार तहसीलदार नानासाहेब आगळे यांना कारवाईसाठी पथक तयार करण्याच्या सुचना दिल्या. या पथकाच्यासम कारवाई दरम्यान सीना नदी पात्रातून एक जेसीबी, एक टिपर आणि चार ट्रॅक्टर अवैध वाळू उपसा करताना आढळून आले.

पथकाने सर्व सहा वाहने पथकाने ताब्यात घेत कर्जतच्या प्रांताधिकारी कार्यालयाच्या आवारात आणून जमा करण्यात आली. या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल अशी माहिती तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी दिली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe