टेस्लाने पुण्यात घेतले ऑफिस, काय आहे एलॉन मस्कचा प्लॅन? वाचा…

Published on -

Elon Musk : टेस्ला कंपनीचे मालक एलोन मस्क आता आपला मोटार वाहन व्यवसाय भारतात विस्तारण्यासाठी सज्ज आहे. एलोन मस्कच्या टेस्ला इंडिया मोटर अँड एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडने पुण्यातील पंचशील बिझनेस पार्क येथे कार्यालयाची जागा भाड्याने घेतली आहे आहे. यापूर्वी कंपनीचा दक्षिणेतील राज्यात प्रकल्प उभारणीचा बेत होता. पण आता कंपनीने पुण्यात तंबू ठोकला आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्र्यांशी चर्चेनंतर टेस्लाने हे पाऊल उचलेल आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, टेस्लाकडून कार्यालयाची जागा पाच वर्षांसाठी भाडेतत्त्वावर घेण्यात आली आहे. टेस्लाने पंचशील बिझनेस पार्क येथील बी विंगच्या पहिल्या मजल्यावर 5,580 चौरस फूट कार्यालयाची जागा घेतली आहे. टेबलस्पेस टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेडसोबत हा करार करण्यात आला आहे.

किती वर्षांचा करार असेल?

1 ऑक्टोबर, 2023 रोजी पासून हा करार सुरु झाला आहे. दरवर्षी भाड्यामधे 5 टक्के दरवाढ होईल. 36 महिन्यांचा लॉक-इन परियड असेल. कंपनीला वाटल्यास 5 वर्षांनंतर करार वाढवू शकते.

टेस्लाने हा करार 60 महिन्यांसाठी केला आहे. कंपनी ही जागा भाड्याने घेण्यासाठी 11.65 लाख रुपये मासिक भाडे आणि 34.95 लाख रुपये सुरक्षा ठेव भरेल. हे लक्षात घेण्यासारखे आहे की, पंचशील बिझनेस पार्क सध्या बांधकामाधीन आहे आणि त्याचा एकूण आकार 10,77,181 चौरस फूट आहे. हे पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळापासून तीन किलोमीटर अंतरावर आहे.

इकॉनॉमिक टाइम्सच्या अहवालानुसार, भारत सरकार टेस्लाच्या परदेशी पुरवठादारांना, विशेषत: चिनी पुरवठादारांना देशात उत्पादन करण्याची देखील परवानगी देऊ शकते. मात्र सरकारकडून याबाबत अजून कोणतीही खुलासा करण्यात आलेला नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News