अहमदनगर Live24 टीम, 27 मे 2021 :- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कायम आहे. यातच जिल्ह्यात गेल्या काही दिवसांमध्ये मृत्यूचे प्रमाण देखील वाढले आहे.
मात्र प्रशासन खरी आकडेवारी लपवत असल्याचे अनेकदा आरोप झाले. यातच काल जिल्ह्याचे पालकमंत्री जिल्हा दौऱ्यावर होते. यावेळी श्रीगोंदा येथे एका कार्यक्रमात हा प्रश्न पुन्हा उपस्थित झाला. यावेळी पालमंत्र्यांनी दडपलेच्या मृत्यूंच्या आरोपाच्या चौकशीचे आदेश दिले आहे.
कोरोना प्रादुर्भावाचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. हि बैठक श्रीगोंदा शहरातील तुळशीदास मंगल कार्यालयात पार पडली. यावेळी प्रारंभी प्रांताधिकारी स्वाती दाभाडे यांनी कोरोनाचा आढावा घेतला.
त्यावर राजेंद्र म्हस्के यांनी, “मृत्यूदर अधिकारी दडवीत आहेत. मोठ्या प्रमाणात माणसे मरत असताना प्रशासन खरी संख्या दाखवीत नाही,’ असा गंभीर आरोप केला. मुश्रीफ म्हणाले, “”कोरोनाची पहिली लाट संपली.
नंतर लग्नसमारंभ, निवडणुका, विविध कार्यक्रम घेत उन्माद केला. त्यामुळे तिसरी लाट जोरात येण्याची चाहूल आहे. पहिल्या व दुसऱ्या लाटेतील चुका तिसऱ्या लाटेत करून जमणार नाही.
असे मुश्रीफ म्हणाले. तसेच यावेळी आमदार पाचपुते यांनी अधिकाऱ्यांचे कौतुक करतानाच, “कोरोना संकटात मोठ्या प्रमाणात मृत्यू झाले. प्रशासन त्याची आकडेवारी कमी दाखवीत असून, नाहाटा यांच्या आरोपांची दखल घ्यावी,’ असे सुचविले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम