अहमदनगर Live24 टीम, 10 मे 2021 :- सुप्यातील पारनेर रोड, बाजारतळ चौक ते शहजापूर चौकापर्यंत भाजी विक्रेते थांबल्याने त्यांच्याभोवती वाढलेल्या गर्दीतून सुप्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होऊ लागली होती.
यामुळे सुपा येथे प्रशासनाने कारवाई सुरू करताच भाजीबाजार बंद झाला आहे कोरोनाची चेन ब्रेक करण्यासाठी व संसर्गाचा धोका टाळण्यासाठी सरकारी अधिकारी, ग्रामपंचायत पातळीवर प्रशासन सातत्याने प्रयत्न करीत आहे.
ग्रामस्थांनी घालून दिलेल्या नियमांचे जबाबदारीने पालन केले, तर कोरोनाच्या प्रसाराचा वेग नियंत्रणात येऊन कोरोनापासून मुक्ती मिळू शकते.
एकाच दिवशी ४६ वर पॉझिटिव्ह रुग्णसंख्या पोहोचल्याने उपाययोजनांची गरज निर्माण झाली होती. ग्रामविस्तार अधिकारी अशोक नागवडे व त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांनी सूचना देऊनही विक्रेते दाद देत नव्हते.
शेवटी विक्रेत्यांविरोधात कारवाई करणार असल्याचे सांगताच त्यांनी काढता पाय घेतला व खरेदीसाठी आलेली मंडळी घराचा रस्ता जवळ करून तेथून निघून गेली.
एका जागेवर थांबून भाजीपाला विक्री करण्यास बंदी असून शेतकरी, विक्रेते फेरीवाले यांना घरोघरी जाऊन सर्व नियमांचे पालन करूनच भाजीपाला, शेतमाल विकण्यासाठी परवानगी आहे, असे प्रशासनाने सांगितले आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|