पूल कोसळला आणि रोलर उलटला; चालक ठार

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 8 एप्रिल 2021 :-कर्जत तालुक्यामध्ये रस्त्याचे काम सुरु असताना अचानक पूल खचून रोलर पलटी झाला.

या अपघातात रोड रोलर चालक सुनिलकुमार गौड यांचा मृत्यू झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की,

कर्जत येथील राशीन रोडवर पाण्याच्या टाकीसमोरून जात असणाऱ्या कर्जत थेरवडी या रस्त्याचे डांबरीकरण काम सुरु आहे.

या रस्त्यावर मंगळवारी कोळवाडी शिवारात जुन्या पूल परिसरात रोलरने रस्त्यावरील मुरूम दाबण्याचे काम सुरु असताना तिथे असणाऱ्या जुन्या पुलावरून दबई करत असताना पूल कोसळला आणि रोलर खाली उलटा झाला.

यावेळी रोलर चालक रोलरखाली दबला आणि रोलरच आवाज आल्याने काही कामगार पळत आले.

त्यांनी तातडीने जेसीबी लावून सुनीलकुमार यास बाहेर काढले. उप जिल्हा रुग्णालय कर्जत येथे नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी मयत असल्याचे सांगितले.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News