चक्क बिबट्या पिंजरा तोडून पळाला; या ठिकाणी घडली घटना

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 28 मे 2021 :-  जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपूर्वी बिबट्याने धुमाकूळ घातला होता. बिबट्याचे मानवी वस्तीवर हल्ले वाढू लागले लागले होते.

मात्र याघटनांमध्ये काहीसे अंतर पडल्यानंतर आता पुन्हा एकदा बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे. बिबट्या जिल्ह्यातील उत्तरेकडील भागांमध्ये पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचे दिसू लागले आहे. यातच पिंजऱ्यात अडकलेल्या बिबट्याने थेट पिंजरा तोडून पळून जाण्यात यशस्वी झाला आहे.

श्रीरामपूर तालुक्यातील भोकर व खोकर परीसरात धुमाकुळ घालत असलेल्या बिबट्या वन विभागाने लावलेल्या पिंजर्‍यात अडकला, मात्र त्याने पिंजरा तोडून, जमिनीला खड्डा करत पिंजर्‍यातून पलायन केल्याची घटना घडली.

या घटनेने शेतकर्‍यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाली असून वनविभागाचीही चांगलीच धांदल उडाली आहे. आता हा पिंजरा दुरूस्त होणार का? नवीन पिंजरा लावणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जेरबंद बिबट्याच्या पिंजऱ्याभोवती दुसरा बिबट्या… :- बिबट्या जेरबंद करण्यासाठी परिसरात पिंजरा लावला. त्या पिंजर्‍यात बिबट्या जेरबंद होण्यासाठी या शेतकर्‍यांनी भक्ष्य म्हणून एक शेळी व एक कोंबडा ठेवला होता. त्या पिंजर्‍यात बिबट्या जेरबंद झाला.

बिबट्याला जेरबंद पाहण्यासाठी काहीजण पिंजऱ्याकडे गेले असता लक्षात आले कि एक बिबट्या जेरबंद झाला असला तरी दुसरा त्या बिबट्याला सोडविण्यासाठी पिंजर्‍याच्या बाजुने घिरट्या घालत आहे. सकाळी या शेतकर्‍यांनी त्या पिंजर्‍याकडे जावून पाहिले असता

त्या पिंजर्‍याचा खालचा भाग तोडून, त्या खालची जमीन उकरून बिबट्याने पलायन केल्याचे लक्षात आले. घटनास्थळी वनविभागाच्या कर्मचारी हजर झाले व ते म्हणाले, पिंजरा तातडीने दुरूस्त करू किंवा दुसरा पिंजरा लावून देवू.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe