लॉकडाऊन वाढविल्यास गोरगरीब जनतेचे हाल

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 6 मे 2021 :-राज्य शासनाने मागील एक महिन्यापासून लॉकडाऊन केल्याने गोरगरीब व हातावर पोट असणाऱ्यांचे रोजगार बंद झाला.

घरामध्ये लागणारे साहित्य नसल्याने गोरगरीब जनता लॉकडाऊनमुळे हतबल झाली असल्याचे नगरसेवक सचिन नागपुरे यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

आता पुढील काळात महाराष्ट्र शासन रुग्णांची संख्या लक्षात घेता लॉकडाउन वाढवण्याचा विचार करत असून आता पुढे पंधरा दिवसाचा लॉकडाऊन वाढवून सर्व सामान्य जनतेचे हाल होणार आहे. त्याचप्रमाणे शासनाने काही वर्गातील लोकांना जी मदत देऊ केली आहे.

ती मदत या लोकांना मिळू शकलेली नाही, त्यामुळे पुढील पंधरा दिवसाचा लॉकडाऊन वाढणार आहे. म्हणून सर्वसाधारण नागरिक व सर्वसामान्य जनता नाराज दिसत आहे.जनतेच्या सर्व समस्यांचा विचार करून लॉकडाउनमध्ये काही प्रमाणामध्ये सूट द्यायला हवी.

जेणेकरून हातावर पोट भरणारे सर्वसामान्य नागरिक यांना दिलासा मिळू शकेल व त्यांचे घर चालू शकेल. शासनाने आरोग्यविषयक लागणाऱ्या सुविधांकडे लक्ष द्यावे.

सर्वसामान्याला होणाऱ्या त्रासापासून थोडा तरी दिलासा मिळायला हवा. जेणेकरून रुग्णांच्या नातेवाईकांची परवड होणार नाही.औषध उपचाराअभावी मृत्यू होणार नाही,याची काळजी शासनाने घ्यावी.त्यावर उपाय योजना कराव्यात, असे नागपुरे यांनी म्हटले आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe