अहमदनगर Live24 टीम, 9 जून 2021 :- नगरसेवकच ठेकेदार झाल्याने राहुरी नगर परिषदेचा कारभार बिघडला असून शहराचा विकास या नावाखाली सत्ताधारी मंडळीकडून स्वत:चा विकास होत असल्याचा आरोप परिवर्तन मंडळाचे नेते रावसाहेब चाचा तनपुरे यांनी केला.
परिवर्तन मंडळाच्या वतीने रावसाहेब चाचा तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी राहुरी नगर परिषद प्रशासनाला विविध मागण्या संदर्भात निवेदन देण्यात आले. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत रावसाहेब तनपुरे म्हणाले, राहुरी शहराच्या पाणी पुरवठा योजनेचे काम ११ टक्के जास्त दराने देण्यात आल्याने नगर परिषदेला तोटा झाला.
कचरा ठेक्यावर महिन्याला १४ लाख रुपये खर्च केले जात आहे.माञ शहरातील अस्वच्छतेचा प्रश्न जैसे थे राहिल्याने ठेकेदारी बाबत अधिकारी व पदाधिकारी यांचे होणारे दुर्लक्ष संशयास्पद ठरले आहे.
नगर परिषद विरोधी पक्षनेते शिवाजी सोनवणे, माजी उपनगराध्यक्ष आर. आर. तनपुरे, नगरसेवक शहाजी जाधव यांनी सत्ताधारी मंडळावर टीका केली. यावेळी आण्णासाहेब शेटे, राजेंद्र उंडे, नगरसेवक अक्षय तनपुरे, गणेश खैरे,
सोन्याबापू जगधने, अरुण साळवे, उमेश शेळके, अतिक बागवान, सचिन मेहेत्रे, नयन शिंगी, दिलीप राका, अफनान आतार, नारायण धोंगडे, भाऊसाहेब काकडे, सुनील पवार, भय्या शेळके, सुजय काळे आदी उपस्थित होते.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम