जिल्ह्यातील शेतकर्‍यांना वरदान असणारे ते आवर्तन सुटले..

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 21 मे 2021 :- जिल्ह्यातील शेतकर्‍यांना वरदान असणार्‍या कुकडी प्रकल्पातील आडगाव धरणांमधून गुरुवारी रात्री 521 क्यूसेस वेगाने पाणी सोडण्यात आले आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी दिली आहे.

या पाण्यामुळे पुणे जिल्ह्यासह नगर जिल्ह्यातील पारनेर, श्रीगोंदा, कर्जत व सोलापूर जिल्ह्यातील करमाळा या तालुक्यातील शेतकर्‍यांना ऐन उन्हाळ्यामध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झालेली असताना पाणी मिळणार असल्यामुळे शेतकर्‍यांमध्ये आनंदी वातावरण निर्माण झाले.

हे आवर्तन टेल टू हेड असून शेतकर्‍यांनी सर्व नियमांचे पालन करत कुठलीही चारी मध्येच न फोडता आवर्तन पूर्ण करण्यासाठी अधिकार्‍यांना सहकार्य करावे.

सर्वांना पुरेसे पाणी यामधून दिले जाणार आहे. कोणीही आवर्तनामध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन आ. पवार यांनी केले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe