अहमदनगर Live24 टीम, 13 ऑगस्ट 2021 :- नगर पाथर्डीमार्गे जात असलेल्या कल्याण विशाखापट्टणम या महामार्गाचे काम सध्या सुरू आहे. लवकरच या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम तिसगाव येथे सुरू होणार आहे.
परंतु तिसगाव येथील महामार्गालगत असणाऱ्या जमीन मालकांना तुटपुंजी आर्थिक मदत देऊन या ठिकाणी चार पदरी रस्ता करण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप ‘त्या’ जागा मालकांनी केला आहे. याबाबत त्यांनी थेट प्रांताधिकार्यांनाच नोटीस पाठवून आपल्या भावना कळवल्या आहेत.

तिसगाव हे पाथर्डी तालुक्यातील एक मोठी व्यापारी बाजारपेठ आहे. त्यामुळे येथील जमिनींना चांगल भाव आहे. त्यामुळे ज्या ग्रामस्थांच्या या रुंदीकरणामध्ये जागा अधिग्रहण होणार आहेत त्यांना चांगला आर्थिक मोबदला मिळावा अशी प्रमुख मागणी ‘त्या’ मालमत्ता धारकांची आहे.
रस्ता रुंदीकरणास ग्रामस्थांचा विरोध नाही परंतु रुंदीकरणात जागा गेल्याने अनेकांचे संसार उघड्यावर येणार आहेत. त्यामुळे त्यांना या जागेचा योग्य मोबदला मिळावा अशी मागणी केली आहे. मात्रसध्या सरकारकडे पैसे शिल्लक नाहीत, त्यामुळे तुम्हाला किती पैसे येणार आहेत,
हे मी तुम्हाला नेमकं सांगू शकत नाही किंवा मी याबाबत निवाडाही जाहीर करणार नाही सदरचा रस्ता केंद्राकडे नसून, तो राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम खात्याकडे आलेला आहे. त्यामुळे कायद्याप्रमाणे विनामोबदला देऊन आम्ही जमिनीचा ताबा घेऊ शकतो
असा धमकीवजा इशाराच तिसगाव येथे चार दिवसापूर्वी झालेल्या एका बैठकीत एका अधिकाऱ्याने दिला. त्यामुळे येथील संबंधित नागरिक व व्यापाऱ्यांनी याबाबत तीव्र संताप व्यक्त केला असून यासंबंधी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना भेटून याबाबत लेखी निवेदन देणार असल्याचा इशारा दिला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम