अहमदनगर Live24 टीम, 5 जून 2021 :- जेष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांनी स्थापन केलेल्या पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेतील संचालक मंडळ बैठकीतील मासिक कामकाजाच इतिवृत्त संचालकांना देण्यास मुख्यकार्यकारी अधिकारी टाळाटाळ करत असून बँकेतील चेअरमन व मुख्यकार्यकारी अधिकार्यांचा एकतर्फी कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
सैनिक बँक संचालक सुदाम कोथिंबिरे यांनी 31 मे 2021 या दिवशी झालेल्या मासिक बैठकीचे इतिवृत्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांना लेखी पत्राद्वारे मागितले मात्र त्यांनी ते देण्यास असमर्थता व्यक्त केली आहे. सैनिक बँकेत 2016 पासून चेअरमन शिवाजी व्यवहारे यांच्या नेतृत्वाखाली एकतर्फी कारभार सूरु झाल्याने सुदाम कोथिंबिरे यांनी इतिवृत व अन्य माहीती मागितली मात्र कोरडे,
व्यवहारे यांनी गैरव्यवहार, गैरव्यवस्थापन व अपहार हे दडपन्यासाठी संचालक मिटिंग मध्ये इतिवृत्त प्रत संचालकांना द्यायची नाही, असा नियमबाह्य ठराव दिनांक 29 जून 2019 व 15 जानेवारी 2020 रोजी करून घेतला आणि त्याचा आधार घेत इतिवृत्त देण्यास टाळा टाळ केली जात आहे.
कोरडे यांच्या मनमानी कारभाराबद्दल जिल्हा उपनिबंधकांकडे 2019 ला तक्रार अर्ज करत पाच वर्षातील कालावधीत संचालक बैठकीतील सर्व विषयाचा अजेंडा व अजेंडा नुसार झालेल्या बैठकीचे प्रोसिडिंग पत्राच्या साक्षांकित प्रतीची मागणी केली.
या तक्रारीनुसार सहाय्यक उप निबंधकांनी बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना संचालकांना माहिती देण्यास सुचविले होते. पण गेले 24 महिन्यात झालेल्या संचालकांच्या बैठकीची माहिती सहकार खात्यातील अधिकार्यांनी आदेश देऊनही संजय कोरडे यांनी दिलेली नाही.
इतिवृत्त व मी मागितलेल्या माहित्या मला त्वरीत मिळाल्या नाही तर प्रसंगी उपोषण करण्यासह कोर्टात दाद मागू असा इशाराही संचालक सुदाम कोथिंबिरे व अन्याय निवारण निर्मूलन सेवा समिती जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी यांनी दिला आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी चौकशीच्या फेर्यात! चेअरमन शिवाजी व्यवहारे, मुख्यकार्यकारी अधिकारी संजय कोरडे या जोडगोळीने काही संचालकांना हाताशी धरत गैरकारभार केला परिणामी त्यांच्यावर चार आर्थिक फसवणूकीचे गुन्हे दाखल झाले आहेत.
या जोडगोळीने अनेक उद्योग बँकेत केले आहेत तसे पुरावे विनायक गोस्वामी यांच्या हाती लागले आहेत. बँकेतील भ्रष्टाचार खणून काढण्यासाठी विनायक गोस्वामी व अन्याय निर्मूलन सेवा समितीने पाच वर्षांपासून सहकार आयुक्त कार्यालयाशी पत्रव्यवहार करत आहेत. त्याला यश आले असून, लवकरच बँकेत केलेल्या आर्थिक गैरव्यवहाराच्या तपासण्या होणार आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम