अहमदनगर Live24 टीम, 25 एप्रिल 2021 :-जिल्ह्यात दिवसभरात 46 मेट्रीक टन ऑक्सिजन उपलब्ध झाल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचीत यांनी दिली.
मात्र, नगर शहराला दैनंदिन 50 मेट्रीक टन आणि उर्वरित जिल्ह्यात 10 मेट्रीक टन असा 60 मेट्रीक टन ऑक्सिजनची आवश्यकता असून
शनिवारी उपलब्ध झालेला साठा हा 24 तासांत वापरला जाणार असल्याने पुन्हा ऑक्सिजनसाठी प्रशासनाला पाठपुरावा करावा लागणार आहे.
जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार शनिवारी दिवसभरात जिल्ह्यासाठी नाशिक येथून दोन ऑक्सिजन टँकर नगरला पोहचले.
हे टँकर रेल्वेने विशाखापट्टणम येथून आलेले आहेत. या टँकरमध्ये 24 मेट्रीक टन ऑक्सिजन उपलब्ध झाले आहे.
यासह पुण्यातील चाकन येथून 10 टनाचा टँकर आणि रायगड जिल्ह्यातील प्रकल्पातून 12 मेट्रीक टन ऑक्सिजनचा पुरवठा झालेला आहे. असा एकूण 46 मेट्रीक टन ऑक्सिजन उपलब्ध झाला आहे.
सोमवारपासून लसीकरण मोहिम सुरू होणार :- जिल्ह्यात करोनाची लस दाखल झाली. यामुळे रविवारी या लसीचे वितरण होवून सोमवारपासून लसीकरण मोहिम सुरू होणार आहे.
जिल्ह्यात 165 लसीकरण केंद्र असून त्या ठिकाणी एका दिवसात किमान 15 हजार जणांच्या लसीकरणाची क्षमता आहे.
यामुळे आलेली लस दोन दिवसात संपणार आहे. त्यानंतर आरोग्य विभागाला पुन्हा लसीसाठी पाठपुरावा करावा लागणार आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|