अहमदनगर Live24 टीम, 12 मे 2021 :- कोरोना आजारावर देशी दारूचा काढा उपयुक्त असल्याचा दावा शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील एका डॉक्टरने केला होता.
आता हेच वक्तव्य आणि हा दावा डॉक्टरांसाठी अडचणीचा ठरला आहे. बोधेगाव येथील डॉक्टरला शेवगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. रामेश्वर काटे यांनी नोटीस बजावली आहे.
नेमके काय आहे प्रकरण ?:- जाणून घ्या कोरोना रुग्णांना ३० एमएल देशी दारू व त्याच प्रमाणात पाणी एकत्र करून दिल्यास कोरोना आजार बरा होतो, असा दावा करणारा संदेश बोधेगाव येथील डॉ. अरुण भिसे यांनी सोशल मीडियावर टाकला होता.
त्यांचा हा दावा राज्यभर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. त्या संदेशात रुग्णांना देशी दारू कोणत्या प्रमाणात द्यायला हवी, तसेच बरे झालेल्या रुग्णांचा अभिप्राय, सोबत काही संशोधनाचे मुद्दे घालण्यात आले होते. तो संदेश दिवसभरात प्रचंड प्रमाणात सोशल मीडियावर फिरल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
दरम्यान हेच प्रकरण आता डॉक्टरच्या चांगलेच अंगलट आलं आहे. शेवगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. रामेश्वर काटे यांनी डॉ. भिसे यांना नोटीस काढून २४ तासांच्या आत खुलासा सादर करण्याचे आदेश दिले आहेत,
तसेच तहसीलदार अर्चना पागिरे यांनी त्यांना संपर्क साधून बुधवारी (दि.१२) तहसील कार्यालयात समक्ष हजर राहून खुलासा देण्याचे आदेश दिले आहेत.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|