अहमदनगर Live24 टीम, 13 जून 2021 :- राहुरी तालुक्यातील डिग्रस येथील एका मुलीला अज्ञात तरूणाने पळवून नेल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली.
९ जून रोजी साडेआठ वाजे दरम्यान ही घटना घडली. या मुलीला तिच्या घरासमोरून अज्ञात व्यक्तीने पळवून नेले. मुलगी गायब झाल्यानंतर घरातील नातेवाईकांनी तिचा शोध घेतला माञ मुलीचा शोध लागला नाही.

file photo
अखेर मुलीच्या वडिलांनी राहुरी पोलिसात धाव घेऊन घटनेची फिर्याद दिली.
या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा तपास हवालदार एकनाथ आव्हाड करीत आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम