अहमदनगर Live24 टीम, 31 मार्च 2021:-राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर नुकतीच ब्रीच कँडी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यानंतर अनेक नेत्यांनी शरद पवारांची विचारपूस केली होती.
त्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी सकाळी शरद पवारांचा रूग्णालयातील फोटो शेअर केला होता. तर आता आमदार रोहित पवार यांनी फेसबुक पोस्ट लिहली आहे.
‘ब्रीच कँडी’ हॉस्पिटलमध्ये आदरणीय शरद पवार साहेबांवर यशस्वी शस्त्रक्रिया करून पित्ताशयातील खडे काढण्यात आले.
सर्वांनाच काळजी वाटत असली तरी साहेबांची प्रकृती सुधारत असून त्यांना लवकर आराम मिळेल. शस्त्रक्रिया करणारे डॉ. मायदेव आणि त्यांच्या इतर सर्व सहकाऱ्यांचे मनापासून आभार!, अशी फेसबुक पोस्ट रोहित पवार यांनी लिहली आहे.
दरम्यान पवार यांच्यावर नुकतीच ब्रीच कँडी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. शरद पवार यांना होत असलेला पोटदुखीचा त्रास वाढल्यानं मंगळवारी रात्री त्यांच्यावर तातडीची शस्त्रक्रिया करण्यात आली.
शस्त्रक्रियेनंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पवार साहेबांची भेट घेतली. यावेळी टोपे व पवार यांच्यामध्ये चर्चा झाली.
पवार यांनी आरोग्यमंत्री टोपे यांच्याकडून इतर विषयांसह राज्यातील कोरोनाच्या स्थितीची माहिती घेतली. हॉस्पिटलमध्ये असतानाही राज्याची काळजी करणाऱ्या या लोकनेत्याला पाहून तर मी थक्क झालो!, असं रोहित पवार यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|