अहमदनगर Live24 टीम, 5 जुलै 2021 :- पतीच्या गैरहजेरीत एका तरुणाने थेट स्वयंपाक घरात येऊन महिलेचा हात धरला व लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून विनयभंग करून डोक्यात पाठीमागील बाजूने मारहाण केली.
ही घटना पुणतांबा येथे घडली असून, याप्रकरणी राहाता पोलीस ठाण्यात एका जणाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक माहिती अशी की, पुणतांबा येथे सायंकाळी साडेसातच्या सुमारास पीडित महिला स्वयंपाक करत होती.
त्यादरम्यान तिचे पती औषधे आणण्यासाठी पुणतांबा गावात गेले होते. त्याचवेळी एक तरुण अचानक घरात घुसला, त्याच्या हातात गजाचा तुकडा होता. त्याने घरात आल्यावर महिलेचा हात धरून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून गजाने महिलेच्या डोक्याचे पाठीमागील बाजूस मारून पळून गेला.
दरम्यान महिला जोरात ओरडल्याने शेजारी जमा झाले. पती आल्यानंतर पीडित महिलेस उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.
याप्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून राहाता पोलिसांनी त्या तरुणावर गुन्हा दाखल केला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम