अहमदनगर Live24 टीम, 6 ऑगस्ट 2021 :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील जनतेशी संवाद साधला आहे. मुख्यमंत्री रात्री 8.00 वाजता सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला,
अहमदनगर बद्दल मुख्यमंत्री म्हणाले
पुणे, अहमदनगर, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, बीड या जिल्ह्यांमध्ये आजही काळजी घेण्याची गरज असल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले आहे.
महापूरग्रस्तांसाठी तात्काळ मदत :- पूरग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर पॅकेजची घोषणा करणार नाही पण सगळ्यांना मदत करण्याचं आश्वासन दिलं होतं. पूरग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर मंत्रिमंडळाची बैठक घेतली. आजदेखील अनेक पालकमंत्री आपत्तीग्रस्तांच्या मदतीसाठी हजर आहेत. आम्ही साडे अकरा हजार कोटींचा निधी जाहीर केला. तात्काळ मदत आणि लॉंगटर्म योजना करत आहोत
कोरोनाची ही टांगती तलवार उधळून लावू:- ७५ वा स्वातंत्र्य दिन आपण साजरा करत आहोत. स्वातंत्र्य दिन म्हटल्यानंतर एक इतिहास वाचत असताना त्यावेळच्या पिढीने कसं झोकून देऊन संघर्ष केलं, त्या काळच्या फक्त आठवणी काढून उपयोग नाही.
आपल्याला कोरोना संकट जाईल असं वाटलं होतं. कमी-जास्त प्रमाणात लाटा धडकत आहेत. किती लाटा येतील याचा अजूनही अंदाज नाही. म्हणून या स्वातंत्र्य दिनाच्या आठ दिवस आधीच मी आपल्याला नम्र विनंती करतो.
तो संघर्ष फक्त आठवायचा नाही तर आपणही आता निश्चय केला पाहिजे की, प्रतिज्ञा घेतली पाहिजे. जसं आपण दीडशे वर्षांचं राज्य उधळून लावलं. तसंच कोरोनाची ही टांगती तलवार उधळून लावू, ती उलथून टाकूच.
- उद्या टास्क फोर्सच्या माध्यमातून राज्यातील करोना स्थितीची आढावा घेतल्यानंतर नियमांमध्ये शिथिलता देण्याचा विचार. त्यानंतर हॉटेल, रेस्टॉरंट्स आणि मॉल्स उघडण्याबाबत निर्णय घेतला जाईल. यात ८ ते १० दिवस जातील
- करोनाचा संसर्ग थोपवायचा असेल तर नियम हे पाळावेच लागतील, जो पर्यंत ठराविक टप्प्यापर्यंत लसीकरण होत नाही, तो पर्यंत नियम पाळावे लागणार
- ही ५० टक्क्यांची अट जो पर्यंत काढून टाकली जात नाही, तो पर्यंत राज्यांना अधिकार देऊन काही उपयोग होणार नाही
- मुंबईत सामान्यांसाठी लोकल 15 ऑगस्टपासून सुरू होणार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील मुद्दे :
- ग्लोबल वार्मिंगमुळे पाण्याची पातळी वाढतेय
- ज्या वसाहती डोंगर भागात वसल्यात त्यांचा नव्यानं विचार करावा लागेल.
- अजूनही पालकमंत्री पुरग्रस्तांच्या मदतीला आहेत
- साडे अकरा हजार कोटींचा निधी पुरग्रस्तांना दिलाय
- अशा संकटाची ही काही पहिली वेळ नाही
- आता अहवालावर फक्त विचार होणार नाही तर कृती होणार
- पन्नास हजार नागरिक निवारा केंद्रात
- धोकादायक वस्त्यांचं पुनर्वसन करावं लागेल
- चिपळूण, महाडमध्ये शिरणाऱ्या पुराच्या पाण्याचं नियोजन करावं लागेल
- ओबीसी आरक्षणासाठी आम्ही इम्पेरिकल डाटा मागितलाय
- जोपर्यंत पन्नास टक्क्याची अट आरक्षणाची शिथिल होत नाही तोपर्यंत काही उपयोग नाही
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम