शहर नामांतराचा मुद्दा पुन्हा पेटला; मनसेने शहरासाठी सुचविले नाव

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 29 मे 2021 :- अहमदनगर शहर स्थापनेच्या दिवशीच मनसेने नगर शहराच्या नामांतराचा मुद्दा उचलून धरला आहे. मनसेने शहरातील कायनेटिक चौकात अहमदनगर शहराला ‘अंबिकानगर’ असं नाव द्यावं, अशी मागणी करणारा फलक उभा केला.

या आंदोलनामुळे नामांतराच्या मुद्द्यावरून शहरातील वातावरण चांगलंच तापलं. औरंगाबादच्या पाठोपाठ अहमदनगरच्या नामांतराचा मुद्दा गाजत आहे. अहमदनगरचे नाव बदलून अंबिकानगर करावे यासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक आहेत.

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने नामांतराच्या मुद्द्यावरून अनेक वेळा आंदोलने केली आहेत. परंतु आज अहमदनगर शहराच्या स्थापना दिवशी केलेल्या आंदोलनामुळे नामांतराच्या मागणीला जोर वाढला. मनविसेच्या या आंदोलनामध्ये सुमित वर्मा यांच्या नेतृत्वाखाली अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.

यावेळी कार्यकर्त्यांनी व्हीआरडीईने चौकात उभारलेल्या सर्कल भोवती देखील अंबिकानगरमध्ये आपले स्वागत आहे, असं फलकही लावले होते. नामांतराची मागणी करताना मनसेनं आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ‘अहमदनगर शहराचे नाव पूर्वी अंबिकानगर असे होते.

त्याचे दाखले शिव स्वराज्यात देखील मिळतात. त्यामुळे अहमदनगरचे नाव हे अंबिकानगर झालंच पाहिजे. तसेच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली लवकरच जनआंदोलन उभारू,’ असा इशारा मनसेच्या सुमित वर्मा यांनी दिला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe