बिबट्याने मध्यवस्तीत घुसून केली शेळी ठार !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 11 जून 2021 :- राहुरी तालुक्यातील अंमळनेर येथे मध्यवस्तीत धुमाकूळ घालत ज्ञानदेव गंगाधर जगताप या शेतकऱ्याची शेळी ठार केल्याची दुर्दैवी घटना रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली.

जगताप यांनी घराशेजारी गोठ्यात बांधलेली शेळी बिबट्याने संरक्षक जाळी उचकटून शेजारील उसाचा शेतात ओढून नेली. यामुळे जगताप यांचे सुमारे १५ हजाराचे नुकसान झाले आहे.प्रवरा परिसरात बिबट्यांच्या उपद्रव वाढला आहे.

शेतात काम करताना, प्रवास करताना मानवावर बिबट्यांचे हल्ले वाढले आहेत. बेलापूर, केसापूर, आंबी, अंमळनेर हा भाग बागायती पट्टा असल्याने ऊसाचे मोठे क्षेत्र आहे. त्यामुळे बिबट्यांना लपण्यासाठी आयते घर मिळते आहे.

बिबटे मुख्यत्वे शेतकऱ्यांच्या शेळ्या, मेंढ्या, वासरे, कुत्री या पाळीव प्राण्यांवर हल्ले करून त्यांना भक्ष्य बनवीत आहेत. गेल्या काही दिवसांत परिसरात मनुष्यांवर बिबट्यांचे हल्ले वाढल्याने या बिबट्यांचा बंदोबस्त करावा,

अशी मागणी अंमळनेरचे सरपंच भारत जाधव, उपसरपंच किरण कोळसे, ग्रामपंचायत सदस्य दादा साळुंके, कोंडीराम साळुंके, रोहण जाधव, रवी पाळंदे, नंदकिशोर जाधव, आंबीचे सरपंच बाळासाहेब साळुंके, उपसरपंच विजय डुकरे, ग्रामपंचायत सदस्य सुनिल लोंढे, पत्रकार विश्वनाथ जाधव,

सुभाष डुकरे, भिम कोळसे, संदिप साळुंके, रावसाहेब फुलमाळी, गणेश कोळसे, पोलिस पाटील सुरेश जाधव, बाळासाहेब लोंढे, धनगर समाज संघर्ष समितीचे तालुकाध्यक्ष जालिंदर रोडे, प्रताप जाधव, सुनिल औताडे यांसह प्रवरा पंचक्रोशीतून होत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe