अहमदनगर Live24 टीम, 9 एप्रिल 2021 :-आमच्याकडे बरेच सोने असून ते स्वस्तात विकायचे आमिष दाखवून पुणे येथील एका व्यक्तीस ते सोने देण्याच्या बहाण्याने जामखेड तालुक्यातील पाटोदा गरडाचे या ठिकाणी बोलावले.
मात्र प्रत्यक्षात सोने न देता पंधरा ते वीस जणांच्या टोळीने त्या व्यक्तीस दहा लाख रुपयांना लुटल्याची घअना घडली आहे.
![](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2021/03/chori.jpg)
या प्रकरणी जामखेड पोलिस स्टेशनला पंधरा ते वीस जणांविरोधात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर असे की, स्वस्तात सोने देण्याच्या बहाण्याने पुणे येथील हडपसर भागात रहणाऱ्या एका व्यक्तीला अमोल (पुर्ण नाव माहीत नाही), परमेश्वर काळे,
रामा (पुर्ण नाव माहीत नाही) व इतर अज्ञात पंधरा ते वीस जणांनी सांगितले की, आमच्याकडे बरेच सोने असून आम्हाला ते स्वस्तात द्यायचे आहे. असे म्हणुन विश्वास संपादन केला.
या नंतर आरोपींनी जामखेड तालुक्यातील पाटोदा गरडाचे या परीसरात त्या व्यक्तीस सकाळी सात वाजण्याच्या सुमारास बोलवले. या वेळी बाजुला पंधरा ते वीस जण दबा धरुन बसले होते.
दबा धरुन बसलेल्या आरोपींना सोबत असलेल्या आरोपींनी इशारा करताच ते आरोपी घटनास्थळी आले व त्यांनी फिर्यादीस कोयता व तलवारीचा धाक दाखवत
त्यांनी सोबत आणलेली १० लाख ७ हजारांची रोख रक्कम व ७ हजार रुपये किमतीचे तीन मोबाईल असे एकूण १० लाख १४ हजार रुपयांचा ऐवज लूटून नेला.
याप्रकरणी पंधरा ते वीस आरोपींविरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|