सेंट्रल रेल्वेत नोकरी लावण्याच्या आमिषाने तरुणाला लाखोंना गंडवले

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 28 ऑगस्ट 2021 :- कोरोनाकाळात बेरोजगारी वाढली आहे. नौकरीची शासवती राहत नसल्याने सरकारी नौकरी मिळवण्यासाठी तरुण धडपडत असतात. व याचाच फायदा काही भामटे घेत असतात व तरुणांना आर्थिक गंडा घालतात.

असाच काहीसा प्रकार जिल्यात घडला आहे. संगमनेर तालुक्यातील कोकणगाव येथील नितीन गंगाधर जोंधळे या युवकाला सेंट्रल रेल्वेत नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवून त्याच्याकडून ५ लाख रुपये घेतले.

या युवकाला टीसी पदावरील बनावट पत्र पाठवून फसवणूक केली. याप्रकरणी नितीन जोंधळे याने फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्याद दिली.

तर तालुक्यातीलच कासारे येथील गोरक्षनाथ लहानू गांडोळे या युवकाची देखील रेल्वेत नोकरी लावून देतो असे आमिष दाखवून त्याच्याकडून ५ लाख रुपये घेतले.

फसवणूक झाल्याचे लक्षात येताच गोरक्षनाथ गांडोळे यांनी फिर्याद दिली. दोघांच्या फिर्यादीनुसार विजयकुमार श्रीपती पाटील (रा. श्रीकृष्ण कॉलनी, कोल्हापूर ह. रा. कंचन कन्फर्ट, निंबाळकर इस्टेट येवले वाडी, पुणे ) याच्याविरुद्ध संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान पोलिसांनी पाटील याला अटक केली आहे. या गुन्ह्यांतील रवींद्र कांबळे (रा. कांबळे वस्ती, तासगाव जि. सांगली) व इंगोले (पूर्ण नाव माहीत नाही रा. शिक्षक कॉलनी, वर्धा) यांचा संगमनेर तालुका पोलीस शोध घेत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe