अहमदनगर Live24 टीम, 28 ऑगस्ट 2021 :- उस्मानाबाद जिल्ह्यातून नाशिककडे ७५ लाख रुपये किंमत असलेला हा गांजा नेला जात असल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

याबाबाबत अधिक माहिती अशी कि, लोणी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक समाधान पाटील, पोलीस नाईक दीपक रोकडे, चालक कैलास भिंगारदिवे हे तिघे लोणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लोणी ते संगमनेर रस्त्यावर पहाटे साडेचार वाजण्याच्या दरम्यान गस्त घालत होते.

यावेळी चंद्रापूर (ता. राहाता) फाटा या ठिकाणच्या बस स्थानकानजीक एक पिकअप् ही संशयित स्थितीत जात असताना दिसली. यावेळी त्यांनी चालकास थांबण्याचा इशारा केला, मात्र चालक थांबला नाही.

पाटील व त्याच्या सहकाऱ्यांनी पिकअपचा पाठलाग करून ती थांबविली. व गाडीतील राहुल बाबासाहेब पवार (वय २३, रा. खर्डा, ता. जामखेड ) व दत्ता मारुती चव्हाण (३५, रा. खर्डा, ता. जामखेड) या दोघांना ताब्यात घेत पिकअपची झडती घेतली असता, त्यामध्ये ५०० किलो गांजा गोण्यांत आढळून आला. या गांजाची किंमत ७५ लाख रुपये इतकी आहे.