अहमदनगर ब्रेकिंग : पत्नीचा खून करून पतीने स्वतःलाही संपविले

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 1 मे 2021 :-जगात पती – पत्नीचे नाते हे सर्वात सुंदर नाते म्हणून ओळखले जाते. आयुष्यभराची साथ देण्याची वचणे देऊन एकेमकांशी लग्नाची लग्नगाठ बांधतात.

मात्र व्यसनाच्या आहारी गेलेला पती हे नाते विसरला व दारूच्या नशेत त्याने स्वतःसह आपल्या पत्नीला ठार मारले.

दरम्यान हा धक्कादायक प्रकार जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कुळधरण येथे घडला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, दारुड्या पतीने पत्नीच्या डोक्यात कुर्‍हाडीने वार करून तिचा खून केला.

त्यानंतर पतीने लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. यामध्ये योगिता गजरमल (पत्नी) व राहुल दिलीप गजरमल (वय ३०) (पती) या दोघांचा मृत्यू झाला आहे.

या दुर्दैवी घटनेने कुळधरण हादरून गेले आहे. व्यसन व व्यसनाच्या आहारी गेलेल्या पतीकडून नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe