अहमदनगर जिल्ह्यातील त्या मृतदेहाचे गूढ उकलले

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 1 मे 2021 :-पारनेर तालुक्यातील मनकर्णिका नदीपात्रात २३ एप्रिलला आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले आहे.

तरसासारख्या जंगली प्राण्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी होऊन वरखेडमळा परिसरात राहणाऱ्या उत्तम अर्जुन औटी (वय ५९) यांचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालात म्हटले आहे.

मानेवर, डोक्याला, तसेच चेहऱ्यावर जखमा असल्याने मृतदेहाची ओळख पटवणे अवघड झाले होते. मृतदेह ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आल्यानंतर उत्तम औटी यांचा भाचा संतोष थोरात याने ओळख पटवली.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe