अहमदनगर Live24 टीम, 28 एप्रिल 2021 :-जिल्ह्यात गेल्या वर्षी पासून कोरोनाची लाट सुरूच आहे.
मात्र गेल्या वर्षीपेक्षा यंदाच्या वर्षात जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे.
यामध्ये दरदिवशी हजारोंच्या संख्येने बाधितांची भर पडते आहे. यातच एक दिलासादायक बाब म्हणजे गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनमुक्त रुग्णांची संख्या देखील वाढू लागली आहे.
जिल्ह्यात आज ३११७ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ लाख ४३ हजार ५२८ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८५.३६ टक्के इतके झाले आहे.
दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ३१२२ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २२ हजार ७०५ इतकी झाली आहे. जाणून घ्या जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती (आकडेवारीमध्ये)
- बरे झालेली रुग्ण संख्या:१,४३,५२८
- उपचार सुरू असलेले रूग्ण:२२७०५
- मृत्यू:१९१९
- एकूण रूग्ण संख्या:१,६८,१५२
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|