एक नंबर कांद्याला प्रतिक्विंटलला मिळाला सतराशे ते तेवीशे भाव

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 16 जून 2021 :-  गेल्या 24 तासात नगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील राहाता बाजार समितीत 13869 गोणी कांद्याची आवक झाली आहे. त्यात एक नंबर कांद्याला प्रतिक्विंटलला 1700 ते 2305 रुपये असा भाव मिळाला आहे.

त्याचबरोबर राहाता बाजार समितीत डाळिंबाच्या 4868 क्रेट्सची आवक झाली. बाजार समितीत कांद्याची मोठी आवक झाली यात एक नंबर कांद्याला प्रतिक्विंटलला 1700 ते 2305 रुपये, 2 नंबर कांद्याला 1150 ते 1650 तसेच 3 नंबर कांद्याला 500 ते 1100 असा भाव प्रतिक्विंटलला मिळाला.

त्याचबरोबर गोल्टी कांदा 1400 ते 1600 व जोड कांदा 300 ते 500 असा प्रतिक्विंटलला भाव मिळाला. डाळिंबाच्या 4868 क्रेट्सची आवक… डाळिंब नंबर 1 ला प्रतिकिलोला 131 ते 190 रुपये इतका भाव मिळाला.

डाळिंब नंबर 2 ला 91 ते 130 रुपये इतका भाव मिळाला. डाळिंब नंबर 3 ला 46 ते 90 रुपये प्रतिकिलोला भाव मिळाला. तर डाळिंब नंबर 4 ला 2.50 ते 45 रुपये असा भाव प्रतिकिलोला मिळाला. अशी माहिती बाजार समितीचे सचिव उध्दव देवकर यांनी दिली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe