थकबाकी वसुलीच्या समस्येवर एकच उपाय… ‘101 कारवाई’ सॉफ्टवेअर

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 12 मार्च 2021:- जिल्हा उपनिबंधक कार्यालय व राज्य पतसंस्था फेडरेशनच्यावतीने आयोजित बैठकीत सहकरी पतसंस्थांची 101 चे दाखले वेगाने सादर होण्यासाठी मीडियाकॉन इंडिया या कंपनीने तयार केलेले ‘101 कारवाई’ या अत्याधुनिक सॉफ्टवेअरची सविस्तर माहिती देण्यात आली.

नवीन सॉफ्टवेअरमुळे कामे होणार सहज :- पतसंस्थांची थकबाकी वसुलीची समस्या सुटसुटीत होऊन 101 चे दाखले त्वरित मिळावे यासाठी सर्व तालुका उपनिबंधकांनी ‘101 कारवाई’ हे नवे सॉफ्टवेअर स्वीकारणे गरजेचे आहे.

त्याचबरोबर जास्तीत जास्त पतसंस्थांनी हे सॉफ्टवेअर घेऊन उपयोग सुरू करावा. ‘101 कारवाई’ या सॉफ्टवेअरमुळे राज्यातील पतसंस्थांची वसुली 1 मे पासून फेसलेस होणार आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांनी दिली.

दरम्यान जिल्हा उपनिबंधक कार्यालय व राज्य पतसंस्था फेडरेशनच्यावतीने आयोजित बैठकीत ‘101 कारवाई’ या अत्याधुनिक सॉफ्टवेअरची सविस्तर माहिती देण्यात आली. उपनिबंधक दिग्विजय आहेर यांनी यावेळी मार्गदर्शन केले.

यावेळी काका कोयटे म्हणाले, पतसंस्थांची कर्ज थकबाकी वेगाने व्हावी यासाठी 101 चे दाखले त्वरित मिळावेत ही मागणी राज्य पतसंस्था फेडरेशन कित्येक वर्षांपासून सहकार विभागाकडे करत आहे.

आता डिजिटल व ऑनलाईन तंत्रज्ञानाचा काळ आला आहे. म्हणूनच राज्य पतसंस्था फेडरेशन व मिडियाकॉन इंडिया या कंपनी यांनी संयुक्तपणे तयार केलेले ‘101 कारवाई’ हे अत्याधुनिक सॉफ्टवेअर मुळे 101 ची प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने गतिमान होणार आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe