या पोलिस अधिकाऱ्याने व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांना मिळवून दिला १२० कोटींचा मोबदला

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 18 फेब्रुवारी 2021:-पिके खरेदी करून त्यांचा मोबदला न देणाऱ्या व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांना  जवळपास १२० कोटी रुपये मोबदला मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. प्रताप दिघावकर यांचा स्नेहबंध फौंडेशन च्या वतीने पदक सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.

विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. दिघावकर यांनी पोलीस दलात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल तसेच शेतकऱ्यांना न्याय दिल्याबद्दल त्यांचा स्नेहबंध चे अध्यक्ष उद्धव शिंदे यांनी हा सत्कार नगरमध्ये केला.

याप्रसंगी पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल, अमित खामकर, प्रसाद कुलकर्णी, आकाश निऱ्हाळी, हेमंत ढाकेफळकर, कार्तिक स्वामी आदी उपस्थित होते.

डॉ. दिघावकर यांनी नाशिकचा पदभार घेतल्यानंतर नाशिकच्या गुन्हेगारीचे प्रमाणकमी झाले आहे. शेतकऱ्यांसाठी काटेकोरपणे निर्णयाची अंमलबजावणी करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe