जन्म मृत्यू दाखले देण्याची प्रक्रिया सुरळीत !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 23 मे 2021 :-  नगर शहरात कोरोना संसर्ग विषाणुंचा प्रादूर्भाव वाढत असल्याने महापानलिकेच्या वतीने कोविड सेंटर व कँन्टोन्मेंट झोनसाठी कर्माचाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत.

त्यामुळे मनपाच्या जन्म व मृत्यू विभाग काही दिवस बंद ठेवण्यात आला होता. याप्रकरणी आयुक्त शंकर गोरे यांच्याशी चर्चा केल्यानंतर आता जन्म व मृत्युचे दाखले देण्याची प्रक्रिया सुरळीत झाली आहे,

अशी माहिती मनपाचे सभागृहनेते रविंद्र बारस्कर यांनी दिली. बारस्कर म्हणाले, कोविड – १९ च्या नियंत्रणासाठी महापालिकेच्यावतीने आवश्यक ठिकाणी मनुष्यबळ उपलब्ध करून दिले.

जन्म व मृत्यू च्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्याही इतरत्र नेमणुका असल्याने हे कार्यालय काही दिवस बंद ठेवण्यात आले होते.

जिल्हाभरातील कोरोना बाधीत रूग्ण उपचारासाठी नगरमधील रूग्णालयात दाखल होतात. त्यात काही जणांचा दुर्दैवी मृत्यू होतो.

ग्रामीण भागातील नातेवाईकांना प्रशासकीय कामकाजासाठी मृत्यू दाखल्याची गरज असते. परंतु, जन्म व मृत्यु नोंद कार्यालय बंद असल्याने ग्रामीण भागातील मृतांच्या नातेवाईकांना या कार्यालयात खेटा घालाव्या लागत होत्या.

नातेवाईकांची गैरसोय होऊ नये, यासाठी आयुक्त गोरे यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर मनपाचा जन्म मृत्‍यू कार्यालयातून दाखले देण्यास सुरूवात झाली, असे बारस्कर यांनी सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe