महसूलमंत्री म्हणाले…जेथे मदत लागेल ते सांगा आम्ही मदत करू

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 24 एप्रिल 2021 :- जिल्ह्यात कडक निर्बंध घालून दिलेले असले तरी, काही ठिकाणी नियमांचे पालन होताना दिसत नाही.

अजूनही लोक रस्त्यावर दिसत आहेत, कायदा मोडणाऱ्यांची गय करू नका अशा सूचना राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज अधिका-यांना दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालय येथे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक घेतली.

महसूलमंत्री थोरात यांनी विविध सूचना दिल्या, त्याबाबत सर्व विभागांना तातडीचे आदेश देऊन कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

थोरात म्हणाले की, बाधित रुग्णांसाठी होम क्वारंटाइन / होम आयसोलेशन पद्धतीचा पुर्नविचार करणायाची वेळ आली आहे.

सर्व रुग्णांना संस्थात्मक क्वारंटाइन केले पाहिजे, घरोघरी जाऊन सर्वेक्षण करून लक्षणे असणाऱ्यांचे विलगीकरण करा,

बाधित रुग्णांना लवकरात लवकर शोधून त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू केल्यास केवळ औषधोपचारावर रुग्ण बरा होऊ शकतो,

जिल्हा नियोजन मंडळातून नगरचे जिल्हा शासकीय रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय कर्जत, पाथर्डी, संगमनेर व श्रीरामपूर येथे दररोज 250 जम्बो सिलिंडर क्षमतेचे ऑक्सिजन उत्पादन केंद्र उभारण्यात येत आहे, त्यामुळे जिल्ह्याला ऑक्सिजनचा अधिक पुरवठा होईल.

जिल्हा नियोजन मंडळ, आमदार निधीतून 100 पोर्टेबल ऑक्सिजन काँसेंट्रेटर मशीन जिल्ह्यातील सर्व ग्रामीण रुग्णालयांना पुरवण्याच्या सूचना यावेळी दिल्या.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe