अहमदनगर Live24 टीम, 8 एप्रिल 2021 :-राज्यासह जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे त्यामुळे रुग्णांना आवश्यक असणाऱ्या वैद्यकीय सेवा देखील आता कमी पडत आहेत.
रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे जिल्ह्याभरात बंद कोव्हीड सेंटर पुन्हा सुरु करण्यात आले आहे. यातच श्रीगोंदयातील बंद झालेले शासकीय कोव्हिडं सेंटर पुन्हा सुरू करण्यात आले आहे.
हे कोव्हीड सेंटर सुरू होऊन हप्त्याभरात शासकीय कोव्हिडं सेंटर आताच हाऊसफुल्ल झाले आहे.
त्यामुळे आता कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना उपचारासाठी खासगीचा आधार घ्यावा लागणार आहे.
दोन दिवसांपूर्वी २४२ एवढी असलेली तालुक्यातील रुग्णसंख्या ही आता जवळपास तीनशे च्या नजीक गेली आहे दिवसागणिक कोरोना रुग्णांची संख्या ही आता झपाट्याने वाढत आहे.
त्यामुळे आता महसूल व नगरपरिषद प्रशासनाने नव्याने कोव्हिडं सेंटर सुरू करण्यासाठी जागेची पहाणी सुरू केली आहे.
तसेच कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व रुग्णालयांसह कोव्हीड सेंटरची कमतरता यामुळे प्रशासनाने आता काही मंगल कार्यालये,
महाविद्यालये यांची पाहणी करून त्याठिकाणी कोव्हिडं सेंटर सुरू करता येईल का याबाबत चाचपणी सुरू केली आहे.
दिवसाला शहरासह तालुक्यात झपाट्याने रुग्णसंख्या वाढत आहे. आता कोव्हिडं सेंटरसह शासकीय दवाखाने हाऊसफुल्ल झाले आहेत.
त्यामुळे आता तरी नागरिकांनी हलगर्जीपणा सोडून कोरोना नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|