अहमदनगर Live24 टीम, 9 जून 2021 :- जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी वाढू लागली आहे. सतत चोरी, दरोडा, लूटमार अशा घटनांमध्ये वाढ होत आहे. यामुळे सर्वसामान्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे.
मात्र या घटनांना रोख लावण्यात पोलिसांना सातत्याने अपयश येत आहे. नगर तालुक्यातील कामरगाव शिवारात सोमवारी अज्ञात चोरटयांनी घरात घुसून माय-लेकीला मारहाण करून घरातला ऐवज लंपास केला आहे.

याप्रकरणी शुभांगी विजय जाधव (वय 21 रा. कामरगाव ता. नगर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार नगर तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरूद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, आई घरामध्ये झोपलेल्या असताना पहाटे चोरट्यांनी त्यांच्या घरात प्रवेश करून फिर्यादी व त्यांच्या आईकडे असलेले सोन्याचे दागिणे, रोख रक्कम,
मोबाईल बळजबरीने काढून घेत पोबारा केला.घटनेची माहिती तालुका पोलिसांना मिळताच पोलीस उपअधीक्षक अजित पाटील, सहायक निरीक्षक राजेंद्र सानप यांनी घटनास्थळी भेट दिली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राऊत करीत आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम













