पंचायत समितीच्या गेटसमोर दोघांत हाणामाऱ्या

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 8 जून 2021 :- राहुरी येथील पंचायत समिती कार्यालयच्या गेट समोर रस्त्यावर दोन तरूणांमध्ये आपापसात दिनांक ७ जून रोजी दगड व विटाने एक मेकांना मारहाण झाली.

सार्वजनिक ठिकाणी मारामारी करून शांततेचा भंग केल्या प्रकरणी सागर गुंजाळ व लक्ष्मण दळे या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय.

राहुरी पोलिस ठाण्यातील हवालदार आजिनाथ पाखरे यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, दिनांक ७ जून रोजी सायंकाळी ७ वाजे दरम्यान यातील आरोपी सागर अशोक गुंजाळ (रा.आझाद चौक राहुरी), लक्ष्मण सोपान दळे (रा.गणपती घाट राहुरी)हे दोघेजण शहरातील स्टेशन रोड परिसरात असलेल्या

पंचायत समिती कार्यालयाच्या गेट समोर रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी आपापसात एक मेकांना शिवीगाळ करून लाथा बुक्कयाने मारहाण करत होते. यावेळी हवालदार सचिन ताजणे यांनी त्यांना मारामारी करू नका, शांत रहा. असे सांगितले. मात्र त्या दोघांनी ऐकले नाही.

कायदा व सुव्यवस्था कायम राहण्यासाठी पोलिसांनी त्या दोघांना ताब्यात घेऊन त्यांची भांडणे सोडवली. यावेळी आरोपी सागर अशोक गुंजाळ याला ताब्यात घेतले तर दुसरा आरोपी लक्ष्मण सोपान दळे हा घटनास्थळावरून पसार झालाय.

पोलिस त्याचा शोध घेत आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक सुशांत दिवटे हे करीत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!