सर्वसामान्य माणसातील ‘त्या’ राक्षसाविरूद्ध ग्रामस्थ एकटावले

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 12 जून 2021 :- कर्जत तालुक्यात राक्षसवाडी नावाच्या गावातील एका व्यक्तीच्या त्रासाला कंटाळून शेवटी पोलिसांनीच या आरोपीला धडा शिकवण्याचे ठरवले.

अखेर पोलिसांनी राक्षसी वृत्तीच्या विकास दिलीप शिंदे (वय २४ वर्ष, राक्षसवाडी बुद्रुक) नामक आरोपीला अटक केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, राक्षसवाडी बुद्रुक गावातील विकास दिलीप शिंदे (वय २४ वर्ष) याला कर्जत पोलिसांनी अटक केली.

न्यायालयाने त्याला चौदा दिवस प्रतिबंधात्मक कारवाईखाली कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. त्यानुसार पोलिसांनी त्याची रवानगी तुरुंगात केली आहे. किमान चौदा दिवस तरी तो गावाबाहेर राहणार असून तेथून बाहेर येताना सुधारणा होईल, अशी पोलिस आणि ग्रामस्थांना आशा आहे.

दरम्यान आरोपी शिंदे गेल्या अनेक दिवसांपासून गावातील लोकांना अशा पद्धतीने त्रास देत होता. कोणीही आपल्या विरुद्ध तक्रार करू शकत नाही, हे लक्षात आल्याने त्याने जास्तच त्रास देण्यास सुरवात केली.

पोलिस निरीक्षक यादव यांना माहिती मिळाल्यावर त्यांनी या तरुणाला ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणले. यादव यांनी त्याला अद्दल घडविण्यासाठी आणि त्यातून सुधारण्याची संधीही देण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेतला.

यानुसार आरोपीला एकाच दिवसाच्या सुनावणीनंतर १४ दिवसांची कोठडी देण्याचा अधिकार न्यायालयाला आहे. त्या आधारे पोलिसांनी खटला पाठविला. न्यायालयात तो मंजूरही झाला आणि शिंदे याची १४ दिवसांसाठी तुरूंगात रवानगी करण्यात आली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe