अहमदनगर Live24 टीम, 12 एप्रिल 2021 :- राहूरी येथील पत्रकार रोहिदास दातीर हत्याप्रकरणातील मुख्य आरोपीस तातडीने अटक केली नाही तर कुटुंबासमवेत आत्मदहन करण्याचा इशारा मयत पत्रकार रोहिदास दातीर यांची पत्नी सविता दातीर यांनी दिला आहे.
राहुरीचे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांना निवेदनाद्वारे सविता दातीर यांनी हा इशारा दिला आहे. ६ एप्रिल रोजी पत्रकार रोहिदास दातीर यांचे राहूरी शहरातून अपहरण करून त्यांची हत्या करून मृतदेह राहूरी कॉलेज जवळ टाकून दिला होता.
पोलिसांनी या प्रकरणी लाल्या उर्फ अर्जुन माळी व तौफिक शेख यांना अटक केली. मात्र मुख्य आरोपी कान्हू मोरे व अक्षय चितळे अद्याप पोलिसांच्या हाती लागले नाही.
दरम्यान रोहिदास दातीर हत्या प्रकरणातील मुख्य आरोपींना तातडीने अटक न केल्यास कुटुंबासमवेत आत्मदहन करू असा इशारा
मयत रोहिदास दातीर यांची पत्नी सविता यांनी राहूरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|