अहमदनगर Live24 टीम, 26 एप्रिल 2021 :-शेवगाव तालुक्यात कोविड -१९ प्रतिबंधित मुबलक प्रमाणात लसीचा पुरवठा व्हावा. कोविड-१९ प्रतिबंधित लस घेण्याची सुविधा प्राथमिक आरोग्य केंद्राप्रमाणेच प्राथमिक आरोग्य उपकेंद्रामध्ये देखील उपलब्ध व्हावी.
आशी मागणी जनशक्तीचे उपाध्यक्ष संजय आंधळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. सध्या कोरोनाचाशेवगाव तालुक्यासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात प्रसार झाला आहे.
ग्रामीण भागात १०० % लसीकरण होणे गरजेचे आहे, मात्र या लसीच्या तुटवड्यामुळे लसीकरणाची मोहीम खंडित होत आहे.
एका आरोग्य केंद्रावर दिवसात फक्त अंदाजे १०० व्यक्तींनाच लस दिली जाते. एका प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत अंदाजे १६ ते २० गावे येतात.
अशा परीस्थितीत तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राची संख्या व अंतर्गत येणाऱ्या गावातील लोकसंख्या पाहता वेळेत लसीकरण होणे अवघड आहे.
त्यात लॉकडाऊनमुळे बंद असलेली प्रवाशी वाहतूकीमुळे ग्रामीण भागातून प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत येणे ग्रामस्थांसाठी गैरसोयीचे आहे. त्याचबरोबर प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात जास्तीच्या गर्दीमुळे संक्रमण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
नवीन शासन निर्णयानुसार १ मे २०२१ पासून १८ वर्षापुढील व्यक्तींना लस देण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला आहे.
एकूणच कोविड-१९ चा सामना करत असताना कमी दिवसात संपूर्ण लसीकरण होणे गरजेचे आहे. त्यासाठी मुबलक लसीचा पुरवठा होणे देखील तितकेच गरजेचे आहे. असेही नमूद केले आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|