अहमदनगर Live24 टीम, 27 जुलै 2021 :- जायफळाचे शरीरास खूप चमत्कारी फायदे होतात. जायफळमध्ये अनेक औषधी गुण असून पेन रिलिव्ह, पोटाचे दुखणे, शरीरातील घाण काढणे,
रक्त शुद्धीकरण, तोंडातील किटाणू मारणे व दातांची निघा राखणे, रक्त पुरवठा सुरळीत ठेवणे, त्वचा चमकावणे असे अनेक कार्य करते. अनेक व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स असतात. फायबर, मॅग्नेशिअम, लोह, व्हिटॅमिन बी ३ व बी ६, कॉपर असते. जे शरीराला लाभदायक आहे.
जायफळ काय आहे? :- मिरिस्टिका वृक्षच्या बी ला जायफळ असं म्हणतात. दिसायला अतिशय लहान आणि साधारण 1 ते दीड इंच इतकं मोठं जायफळं असतं. याचं फळ झाडावर येतं आणि ते साधारण लाल आणि पिवळ्या अशा मिक्स रंगाचं असतं. पिकल्यानंतर हे फळ दोन भागामध्ये फाटतं आणि यातून जायफळ येतं. त्याला जावित्री असंही म्हणतात. जावित्रीच्या आतामध्ये असणारी गुठळी तोडल्यावर जायफळ येतं. जायफळ हे वनस्पतीजन्य नाव असून याला Myristica fragrans आणि संस्कृतमध्ये जातीफळ असं म्हटलं जातं. हे चीन, तैवान, मलेशिया, केरळ, श्रीलंका आणि दक्षिण अमेरिकामध्ये जास्त प्रमाणात पिकतं.
हृदयाचं आरोग्य राहतं उत्तम :- जायफळचा व्यवस्थित डोस घेतल्यास हृदयविकारांपासून आपण बचाव करू शकतो. हाय कोलेस्ट्रॉल आणि हाय ट्रायग्लिसराईडचं प्रमाण कमी करण्यासाठीही जायफळ उपयुक्त ठरतं.
मूड स्विंग उत्तम करतं :- जायफळ उदासीनतेवर उपयुक्त ठरतं आणि म्हणूनच मूड स्विंग होत असल्याचं ते चांगलं करण्याचं काम जायफळ करतं. डिप्रेशन सारख्या लक्षणांवर याचा खूप फायदा होतो. अशा परिस्थितीत दररोज जायफळचा उपयोग खाण्यात करणं आवश्यक आहे.
स्मरणशक्ती :- जायफळ स्मरण शक्ती वाढवते. जायफळ खाल्याने मेंदू दुप्पट पटीने काम करतो आणि नवीन नवीन गोष्टी शिकण्यास प्रेरणा देतो.
बॉडी डिटॉक्स :- शरीरातील आणि रक्तातील सर्व टॉक्सिन्स काढण्याचे काम जायफळ करते. किडनी स्टोन आणि लिव्हर सारखे आजार बरे करण्यास याची महत्वाची कामगिरी असते.
तोंडाची दुर्गंधी होते दूर :- जायफळामध्ये तोंडाची दुर्गंधी दूर करण्याचेही गुण असतात. अनेक वेळा गळ्याजवळ व्हायरस किंवा बॅक्टेरिया चिटकून राहतात आणि त्यामुळे तोंडाला दुर्गंध येतो. जायफळचा वापर पेस्ट सारखा केल्यास तोंडाचा हा दुर्गंध निघून जातो. तसंच इंफेक्शनपासूनही आपला बचाव होतो.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम