वर्षातून एकदा नव्हे हा दिवस ‘दररोज’ साजरा व्हावा! गृहमंत्री देशमुख यांची महिला पोलिस कर्मचाऱ्यांना खास भेट

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 08 मार्च 2021:-  महिला दिनाच्या पूर्वसंध्येला गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राज्यातील प्रत्येक नागरिकाच्या रक्षणासाठी कोणत्याही संकटाला अत्यंत खंबीरपणे सामोरे जाणाऱ्या.

कितीही कठिण प्रसंग आला तरीदेखील विचलीत न होणाऱ्या, आपल्या पोलिस दलातील महिला पोलिस कर्मचाऱ्यांना सलाम करून महिला दिनाची खास भेट दिली आहे.

महिला दिनाच्या पूर्वसंध्येला गृहमंत्री देशमुख यांनी राज्यातील सर्व पोलिस कर्मचाऱ्यांना पत्र पाठविले असून त्यात म्हटले आहे की, ऊन, वारा, पाऊस, दिवस, रात्र…

एवढंच काय कोरोनाच्या विषाणूपुढे देखील तुम्ही नमल्या नाहीत व यापुढेही नमणार नाही. रणचंडिका, दुर्गा, वैभव संपन्नलक्ष्मी, विद्यावती सरस्वती या रुपात आणि लेकाची माय, बापाची लेक, भावाची बहिण, संसारातील अर्धांगिनी या नात्यात महिला कार्य करतात.

प्रेम, वात्सल्य, आपुलकी, स्नेह, लळा, जिव्हाळा, मायेचा सागर, सेवा, क्षमा, कर्तव्य, कारुण्य, त्यागाची मूर्ती आहेत. त्यामुळेच पृथ्वी शेषाच्या फण्याने नव्हे तर तुम्ही साऱ्याजणींनी पेलली आहे.

‘वर्दी’तील माता-भगिनींबद्दल तर आणखी आदर वाटतो. तुमच्यातील आई, पत्नी, बहिण, मुलगी ही सारी नाती घरी ठेवून तुम्ही कर्तव्याला प्राधान्य देवून वर्दी चढवता.

रणरागिणी होऊन महाराष्ट्राच्या रक्षणासाठी दिवसरात्र तैनात होता. म्हणूनच वर्षातून एकदाच हा दिवस साजरा का करावा? महिला दिन रोज साजरा करायला हवा. अशा शब्दांत त्यांचे कौतुक केले आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe