अहमदनगर Live24 टीम, 2 मे 2021 :- आज या घडीला राज्यासह जिल्ह्यात मोठ्या संख्येने कोरोनाबाधीत रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहे.
वाढत्या रुग्णसंख्येने सर्वच हॉस्पिटलमध्ये अनेकांना बेड, ऑक्सिजन अथवा वेळेत व योग्य उपचाराअभावी जीव गमवावे लागले आहेत. आशा कठीण काळात राजकीय नेते मात्र गायब झाले आहेत.
परंतु कर्जत तालुक्यातील एका शेतकरी कुटुंबातील कोरोनाबाधित रुग्णाला माजी मंत्री राम शिंदे यांनी अत्यंत कमी वेळात ‘ते’ इंजेक्शन उपलब्ध करून दिल्यामुळे त्या रुग्णाचा जीव वाचला आहे.
त्यामुळे ही मदत आम्ही आयुष्यभर विसरू शकणार नाहीत,अशीच प्रतिक्रिया त्या कुटुंबातील सदस्याने व्यक्त केली. याबाबत सविस्तर असे, कर्जत तालुक्यात देखल सध्या कोरोनाने थैमान घातले आहे.
दररोज मोठ्या संख्येने कोरोनाबाधीत रुग्ण आढळत आहेत. तालुक्यातील एका शेतकऱ्याला अशीच कोरोनाची बाधा झाली. त्यामुळे तो रुग्ण खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहे. त्याचा जीव वाचविण्यासाठी त्यास रेमडीसीवरची गरज असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यानी सांगितले.
यावेळी त्या पेशंटचे नातेवाईक ग्रामीण भागातील असल्याने त्यांना अनेक अडचणीला आणि संकटाला सामोरे जावे लागले. शेवटी त्यांच्या एका नातेवाईकाने पंचायत समितीचे माजी सभापती शेळके आणि तालुका भाजपाचे कोषाध्यक्ष भिसे
यांना फोन करून रेमडीसीवर बाबत विचारणा केली. या दोघांनी या नातेवाईकास धीर देत माजीमंत्री प्रा राम शिंदे यांना या परिस्थितीची माहिती दिली.
राम शिंदे यांनी तात्काळ महत्वाचे कागदपत्रे जमा करण्याचे सांगून ‘त्या’ कोरोनाबाधीत रुग्णासाठी रेमडीसीवर उपलब्ध करून देत दिलासा दिला.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|