अहमदनगर Live24 टीम, 28 एप्रिल 2021 :-रेमडेसीविरच हेच कोरोनावर उपचार नसून त्याचा बाऊ करू नका. रुग्ण नॉर्मल उपचारानेही बरे होत आहेत. तसेच लसीकरण करणे महत्वाचे आहे.
पण ते गर्दी करून न करता सर्व नियम पाळून करून घ्यावेत, असे अावाहन खासदार डॉ. सुजय विखे यांनी पत्रकारांशी बोलताना केले. जे गंभीर रुग्ण आहेत, त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांच्या अभ्यासानुसार ठरवलेले उपचार करू द्यावे.
नातेवाईकांनी त्यांना रेमडेसीविरचा सल्ला न देता त्यांना उपचारासाठी स्वातंत्र्य द्यावे. भविष्यात आणखी रेमडीसीवरचा तुटवडा वाढण्याची दाट शक्यता आहे, असे सूचक वक्तव्य विखे यांनी व्यक्त केले.
व्हेंटिलेटरचा तुटवडा निर्माण होत आहे. पुढील ३ ते ४ दिवस जनता कर्फ्यु पाळला गेला, तर निश्चित कोरोना साखळी ब्रेक होईल. यासाठी नागरिकांनी स्वत: पुढे येत पाळावे, असे आवाहन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रथमतः लसीकरण करावे, असे आवाहन केले होते.
मात्र, त्यास सकारात्मक प्रतिसाद मिळाला नव्हता. त्यामुळे लस आणि त्याचा साठा वाया जाऊ नये. त्यामुळे ती लस भारत सरकारने बाहेर दिली होती. आता कोरोनाची दुसरी लाट मोठ्या प्रमाणात सक्रीय झाली आणि नागरिकांना लसीकरणाचे महत्त्व समजले.
आता लसीकरण साठा अल्प असल्याने यामध्ये काही अंशी खंड पडत असून अल्प प्रमाणात तुटवडा निर्माण झाला. मात्र, ही परिस्थिती लवकरच सुधारेल आणि सर्वाना लस मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्वि