अहमदनगर Live24 टीम, 1 एप्रिल 2021 :- गेल्या सात वर्षापासून देश चुकीच्या लोकांच्या हातात असल्याने सरकार चालवण्याऐवजी फक्त चुकाच केल्या जात आहेत.
नोटाबंदी, टाळेबंदी, चुकीच्या पद्धतीने केलेली GST ची अंमलबजावणी, इंधन दरवाढ या तर उघड्या डोळ्यांनी केलेल्या घोडचुका आहेत त्या कधी सुधारणार?
की देशाची वाट लावतच राहणार?” असं ट्विट महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केंद्र सरकारवर टिकास्त्र सोडले आहे.
केंद्रातील मोदी सरकारने बुधवारी रात्री अल्प बचत योजनांवरील व्याज दर कमी करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाचा फटका सामान्य गुंतवणुकदारांना बसला असता.
केंद्राच्या निर्णयामुळे सर्वच स्तरातून टीका होऊ लागली. यानंतर सकाळी निर्मला सीतारमण यांनी सकाळी ट्विट करत हा आदेश मागे घेतल्याचं जाहीर केलं.
यावर मंत्री थोरात यांनी ट्विटवर प्रतिक्रिया नोंदवताना म्हटले की, नोटाबंदी, टाळेबंदी, चुकीच्या पद्धतीने केलेली GST ची अंमलबजावणी,
इंधन दरवाढ या तर उघड्या डोळ्यांनी केलेल्या घोडचुका आहेत त्या कधी सुधारणार?, असा सवाल बाळासाहेब थोरात यांनी केला.
लहान बचत योजनांमध्ये व्याजकपात करण्याचा निर्णय बुधवारी केंद्राने जाहीर केला. त्यानंतर काही वेळातच तो निर्णय मागेदेखील घेण्यात आला आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी हा आदेश चुकून निघाल्याचं सांगत व्याजदर जे आहेत, तसेच राहतील, असं स्पष्ट केलं. यावरुन विरोधी पक्षांनी निशाणा साधला आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|