दोन कुटुंबात शेतात जनावरे चारण्याच्या कारणावरून मारामारी

Ahmednagarlive24
Updated:

अहमदनगर Live24 टीम, 8 जून 2021 :- दोन कुटुंबात शेतात जनावरे चारण्याच्या कारणावरून मारामारी झाली. हि घटना राहुरी तालुक्यातील खडांबे खुर्द येथे घडली.

याबाबत दोन्ही कुटुंबाने राहुरी पोलिसांत परस्पर विरोधात गुन्हे दाखल केले आहेत. याबाबत अधिक माहिती अशी कि, पहिली घटना ही 5 जून रोजी सकाळी 10 वाजे दरम्यान फिर्यादी व आरोपी यांच्या शेतातील सामायिक बांधाजवळ घडली.

या घटनेतील फिर्यादी महिला ही तिचा दीर, जाव व पुतणे यांच्याबरोबर शेतामध्ये काम करत होती. यावेळी अमोल वसंत साळवे हा त्याची जनावरे चारीत होता. त्याची जनावरे फिर्यादी महिलेच्या शेतामधील उसाचे पीक खाऊ लागल्याने फिर्यादी महिला त्याला म्हणाली,

शेताचे सामाईक बांधावर जाऊन तुझी जनावरे तिकडे हाकलून घे. असे म्हणाल्याचा त्याला राग आल्याने त्याने फिर्यादी महिलेस शिवीगाळ करुन फोन करुन अंतवन योहान साळवे, कुसूम अंतवन साळवे, विमल वसंत साळवे, मनिषा वसंत साळवे, प्रशांत वसंत साळवे सर्व रा. खडांबे खुर्द ता. राहुरी यांना बोलावून घेतले.

त्यांनी शेताचे सामाईक बांधावर येऊन फिर्यादी महिलेस शिवीगाळ करुन लाथाबुक्कयाने मारहाण केली व तिचा विनयभंग केला. त्यावेऴी तिने आरडाओरडा केला असता त्यांचा दीर, जाव व पुतणे हे पळत येऊन त्यांचे भांडण सोडवू लागले.

त्यावेळी आरोपींनी त्यांनाही लाथाबुक्क्याने मारहाण केली. या घटनेचा तपास हवालदार आव्हाड हे करीत आहेत. दुसरी घटना ही त्याच दिवशी दुपारी अडीच वाजे दरम्यान खडांबे खुर्द येथे घडली. खडांबे खुर्द गावात फिर्यादी महिला ही तिचे घरासमोर बसली होती.

यावेळी आरोपी यांनी संगनमत करून फिर्यादीचे घरासमोर एकत्रित आले. त्यावेळी आरोपी तिला म्हणाले, सामायिक बांधावरून नेहमीच आमच्याशी भांडता. तुम्ही आमच्या खाणीवर पाणी भरण्यासाठी व जनावरांना पाण्यासाठी आणायचे नाही.

ही खाण आमची आहे. असे सांगून फिर्यादी महिलेस आरोपींनी धक्काबुक्की करून मारहाण केली. या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक दिनकर चव्हाण हे करीत आहेत. या दोन्ही घटनांबाबत परस्पर विरोधात एकूण 16 ते 17 जणांवर राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe