ऑक्सिजन एक्सप्रेसमधून आलेले दोन टँकर संगमनेर व नगर येथे पोहचले

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 24 एप्रिल 2021 :- नाशिक जवळील देवळाली येथील रेल्वे मालधक्क्यावर आलेल्याऑक्सिजन एक्सप्रेसमधून आलेले दोन ऑक्सिजनचे टॅंकर संगमनेर येथील नायब  तहसीलदार उमाकांत कडनोर यांनी अत्यंत कडोकोट पोलिस बंदोबस्तात संगमनेर आणि नगर येथे नेऊन पोहचविले.

विशाखापट्टणम येथून आलेल्या ऑक्सिजन एक्सप्रेस मधून ४ऑक्सिजन टँकर उतरवले त्या पैकी सध्या ऑक्सिजनची कमतरता असलेल्या संगमनेर आणि नगर या दोन मोठ्या शहरांसाठी सकाळी रवाना करण्यात आले.

पोलीसांच्या कडे कोट बंदोबस्त मध्ये दुपारी दीड वाजनेच्या सुमारास क-हे घाटामधील  जाजू यांच्या ऑक्सिजन रिफिलिंग सेंटरवर आणून 14 टन ऑक्सिजन टँकरमधून खाली  केला

तर  तर दुसरा टॅंकर अहमदनगरकडे पाठविण्यात आलेला असून तो जिल्हा रुग्णालयातील रिफेलिंग सेंटरवर सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास खाली केला आहे.

संगमनेर आणि नगर  या दोन शहरासाठी दोन ऑक्सिजन टँकर आले असल्यामुळे आता या दोन्ही  शहरातील खाजगी आणि सरकारी रुग्णालयातील ऑक्सिजनची टंचाई कमी झाली असून

विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत असले ल्या  ऑक्सीजन वरील कोविड बाधित रुग्णांना खऱ्या अर्थाने दिलासा मिळाला आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe