अज्ञात चोरटयांनी महिलेस अडवून दागिने लुटले

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 8 जून 2021 :- नगर पुणे रोडवरील कामरगाव येथेअज्ञात चोरांनी चाळीस वर्षीय महिलेस आडवून मारहाण करून तिच्याकडे सोन्याचे दागिने मोबाईल व रोख रक्कम असा ऐवज बळजबरीने चोरून नेला.

याबाबतची अधिक माहिती अशी की येथील चाळीस वर्षे महिला रस्त्याने जात पायी असताना अज्ञात चोरांनी तिला अडवून मारहाण करून तीचाकडील सोन्याचे दागिने,

रोख रक्कम व मोबाईल असा 51 हजार रुपये किमतीचा ऐवज बळजबरीने चोरून गेला. ही घटना नगर पुणे रोड वरील कामरगाव येथे घडली.

याप्रकरणी नगर तालुका पोलिसांनी शुभांगी विजय जाधव ( वय.21 राहणार कामरगाव तालुका नगर ) यांच्या फिर्यादीवरून चोरीच्या गुन्ह्याची नोंद केली. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक राऊत हे करीत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe