अवकाळी पावसाच्या तडाख्याने रब्बी पिकांचीे वाट लावली

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 23 मार्च 2021:-  जिल्ह्यात सोमवारी वादळी वार्‍यासह पाऊस झाला. कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव परिसरात, नेवासा तालुक्यातील चांदा-बर्‍हाणपूर परीसरात राहात्यातील राजुरी, श्रीरामपूर शहर व परिसरात अवकाळी पावसाच्या तडाख्याने रब्बी पिकांचीे वाट लावली.

काही भागात गाराही झाल्याने हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. गेली दोन दिवसापासून या भागात पाऊस अत्यल्प होत होता. मात्र सोमवारी जोरदार पाऊस झाल्याने सर्वत्र पाणी साचले.

बर्‍हाणपूर परीसरातील बहुतांशी भागात गाराही झाल्याने काढणीस आलेल्या शेकडो एकर गव्हासह इतर पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. गहू भुईसपाट झाला.

कांद्यालाही याचा जबरदस्त फटका बसला आहे. फळ पिकांचेही नुकसान झाले. आंब्याचा मोहोर वादळाने गळाला आहे. चांदा येथील पुंडवाडी परीसरातही जोरदार पाऊस झाला आहे.

चांदा परीसरातील बर्‍याच भागात वादळ जास्त मात्र पाऊस अत्यल्प झाला. सर्वाधिक नुकसान गहू आणि कांदा पिकाचे झाले असून आडवा झालेला

गहू आता कसा काढायचा याची धास्ती बळीराजाला पडली आहे. नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी शेतकर्‍यानी केली आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe