कोरोनाचा धोका वाढत असताना गेल्या आठ दिवसांपासून लसीकरण ठप्प

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :-  जिल्ह्यात कोरोनाचा वाढता धोका पाहता सुरुवातीस लसीकरण मोहीम वेगाने राबवण्यात आली. मात्र आता पुन्हा एकदा लसीकरण मोहीम थंडावली आहे.

यातच जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्यासाठी लसीकरण महत्वाचे असताना जिल्ह्यात लसीचा तुटवडा जाणवत आहे.

यामुळे अनेक ठिकाणी लसीकरण ठप्प झाले आहे. यामुळे भविष्यात धोका वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील सात्रळ येथे सातहजार लोकसंख्येच्या तुलनेत केवळ 50 लस नागरिकांच्या पदरात पडल्या आहेत.

तर तालुक्यातील अनेक ठिकाणी राहुरी शहर वगळता लसीकरण ठप्प झाले आहे.देवळाली प्रवरा येथेही सुमारे 50 हजाराहून अधिक लोकसंख्या असली तरीही गेल्या आठ दिवसांपासून लसीकरण ठप्प झाले आहे.

एकीकडे जगातील शास्त्रज्ञांच्या मते करोना विरुद्धच्या लढ्यात लसीकरण हे महत्वाचे पाऊल असल्याचा सल्ला देत असताना दुसरीकडे खेडोपाडी असलेल्या छोट्या आरोग्य उपकेंद्रांना पाहिजे तितक्या प्रमाणात लस उपलब्ध नसल्याचे चित्र जिल्ह्यात दिसत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe