अहमदनगर Live24 टीम, 9 मे 2021 :- अहमदनगर महानगरपालिका क्षेत्रात कोव्हक्सीनचे डोस गेल्या काही दिवसात उपलब्ध होत नाहीत.
त्यामुळे ४५ च्या पुढील ज्या जेष्ठांनी १ ला डोस घेतला असेल व दुसऱ्या डोसची मुदत संपली आहे. अशा नागरिकांना मानसिक त्रास होत आहे.
बरेच जेष्ठ नागरिक ३ ते ४ केंद्रावर जाऊन लसीची चौकशी करत आहेत.याबाबत मनपाचे सभागृह नेते रविंद्र बारस्कर यांनी जिल्हा परिषद मुख्याधिकारी क्षीरसागर तसेच
मनपा आयुक्त शंकर गोरे यांच्याशी समक्ष यासंदर्भात चर्चा केली असता याविषयावर लवकरच सकारात्मक मार्ग काढण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले.
त्यामुळे मनपा केंद्रावर दुसऱ्या डोससाठी जेष्ठांसाठी कोव्हक्सीन लस उपलब्ध होईल अशी आशा सभागृह नेते बारस्कर यांनी व्यक्त केली.
गेल्या एक महिन्यापासून कोव्हक्सीन लसीचा तुटवडा जाणवत असल्यामुळे काही ज्येष्ठ नागरिकांनी पहिला डोस कोव्हक्सीन लसीचा घेतला आहे. त्यासाठी तरी दुसरा डोस मिळण्यासाठी ज्येष्ठांना वारंवार लसीकरण केंद्रावर हेलपाटे मारावे लागत आहेत.
तरीसुद्धा ही कोव्हक्सीन लस उपलब्ध होत नाही ,त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|