अहमदनगर Live24 टीम, 28 मे 2021 :- जिल्हयातील काही ठिकाणी आजपासून रविवारपर्यंत मेघगर्जनेसह वीजा आणि वादळी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
आजपासून पुढील तीन दिवस जिल्हयात ३० ते ४० किमी प्रति तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी दक्षता घेणे गरजेचे असल्याचे जिल्हा प्रशासनाने बजावले आहे आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदतीसाठी नजिकचे पोलीस ठाणे,
तहसील कार्यालय तसेच जिल्हा नियंत्रण कक्ष 1077 (टोल फ्री), 0241-2323844, 2356940 या क्रमांकावर संपर्क करावा.
नागरिकांनी विजा चमकत असताना संगणक, टीव्ही सारखे विद्युत उपकरणे बंद ठेवून स्त्रोतांपासून दुर ठेवावेत, दूरध्वनी व भ्रमणध्वनीचा वापर टाळावा, विजा चमकत असताना घराबाहेर पडू नये, घराबाहेर असल्यास सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा,
विजेच्या खांबांपासून दुर थांबावे, उंच झाडाखाली आश्रयास थांबू नये, मोकळ्या परिसरात असल्यास, गुडघ्यामध्ये डोके घालून खाली वाकून बसावे, धातूच्या वस्तू दूर ठेवाव्यात. पावसात व सोसाट्याच्या वारयात घराबाहेर पडणे टाळावे, घराबाहेर अथवा असुरक्षित ठिकाणी असल्यास
पाऊस व वारा थांबेपर्यंत सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा, अतिवृष्टीच्या परिस्थितीत व सोसाट्याचा वारयात सुरक्षित ठिकाणी राहा व प्रवास करू नका, पावसात झाडाखाली उभे राहू नये, मोबाईलवर संभाषण करू नये, इलेक्ट्रिक वस्तूंपासून दुर रहावे.
अशा परिस्थितीत पक्के घर किंवा इमारतीत आसरा घ्यावा. नागरिकांनी हवामानाची माहिती भारतीय हवामान खात्याच्या www.imd.gov.in या संकेतस्थळावरून घ्यावी.कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका व अफवा पसरवू नका.
आपत्कालीन स्थिती उद्भवण्याची शक्यता असलेल्या ठिकाणांच्या नागरीकांनी जागरूक राहुन प्रशासनाला सहकार्य करावे.असे आवाहन करण्यात आले आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम