अहमदनगर Live24 टीम, 23 एप्रिल 2021 :-राहुरी तालुक्यात दूध विक्री करतांना करोना नियमांचे पालन न केल्याने सात्रळ दूध डेअरीवर तहसीलदार शेख यांनी दंडात्मक कारवाई केली आहे.
तहसीलदारांनी केलेल्या या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तहसीलदारांनी सात्रळ परिसराला भेट देऊन अनेक दुकानदार तसेच अवैध व्यवसायाच्या ठिकाणी भेटी देऊन दंडात्मक कारवाई केली.
यावेळी बोलताना तहसीलदार शेख म्हणाले कि, ‘आज गरीब जनता करोना महामारीमुळे संतप्त झाली असून तुम्हाला तुमचा धंदा प्रिय आहे. शासनाने नियमाचे बंधन घालून देखील तुम्हाला त्याचे कोणतेही गांभीर्य नाही ही शोकांतिका आहे.
येथून पुढे असेच जर तुमचे कृत्य चालले तर शासन निर्णयानुसार तुमच्या डेरीवर मोठी कारवाई करण्यात येईल.’ असा इशारा त्यांनी दिला आहे. जिल्ह्यात कोरोनाची भयावह परिस्थिती असतानाही दूध डेअरीवर मोठी गर्दी आढळून आली.
तसेच या डेरी मालकाने सॅनिटायझर व करोना संदर्भातील कोणतेही काळजी घेताना दिसली नाही. त्यामुळे त्यांच्यावर आम्ही दंडात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती शेख यांनी दिली आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|